महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे संलग्नित, भंडारा जिल्हा सर्वस्तरीय कलाकार संस्था तुमसर व तालुका शाखा मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोहाडी तालुक्यातील कान्हाळगाव येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव २०२६ चे शानदार आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १० जानेवारी रोजी या महोत्सवाचा जिल्हा परिषद शाळेच्या भव्य पटांगणावर उत्साहात शुभारंभ झाला असून, रविवारी ११ जानेवारीपर्यंत हा सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील विविध कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने कवी संमेलन, गायन