माहूर: माहुर रोडवर बागवान गल्लीतील आरोपी दोन बैल कत्तल करण्यासाठी घेऊन जात असताना पोलिसांना मिळुन आला;माहुर पोलिसात गुन्हा दाखल
Mahoor, Nanded | Oct 17, 2025 माहुर रोडवर दि 16 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास यातील आरोपी नामे मोहम्मद आरिफ मोहम्मद हसन वय 43 वर्ष राहणार बागवान गल्ली माहूर हा गोवन चे जातीचे दोन बैल जनावर किमती 50 हजार रुपयाचे विनापरवाना कत्तल करण्याचे उद्देशाने घेऊन जात असताना पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी माहूर पोलीस स्टेशन येथे प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे.