महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा 'सातबारा कोरा' करून कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता स्थापनेनंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय न घेतल्याने, हे सरकार पुढील वर्षी शेतकऱ्यांचा सातबारा खरोखरच कोरा करणार काय, असा संतप्त प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी उपस्थित केला आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमा