जळगाव जामोद: त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारावरील हल्ल्याचा पत्रकार संघाच्या वतीने निषेध, उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्रीना निवेदन
आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद पत्रकार संघाच्या वतीने त्रंबकेश्वर येथे पत्रकरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला व उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. पत्रकारावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.