सरळ सेवा भरती 2024 मधील एनएसडब्ल्यू भरतीत झालेल्या कथित गैरव्यवहारावरून अकोल्याचे तत्कालीन उपसंचालक आरोग्य सेवा कमलेश भंडारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी दोघांनी संगनमत करून मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला. तपास चुकवण्यासाठी तीन अधिकाऱ्यांना “बळीचे बकरं” बनवले गेल्याचेही माहिती समोर आली आहे.