जालना: जालना जिल्ह्यातील दिव्यांगांना आता न्याय मिळणार; पुनर्वसन केंद्र महाराष्ट्रात आदर्श ठरेल – पालकमंत्री पंकजा मुंडे
Jalna, Jalna | May 1, 2026 जालना जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना आता शासनाच्या विविध योजनांचा लाभ, मार्गदर्शन आणि पुनर्वसनासाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार असून गांधी चमन येथे उभारण्यात आलेल्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना न्याय मिळेल, असा विश्वास जिल्ह्याच्या पालकमंत्री पकजा मुढे यांनी व्यक्त केला. हे केंद्र महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गांधी चमन येथे आयोजित भव्य उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे उद