लसीकरणाविषयी गैरसमज करून न घेता आपण गोवर- रुबेलाचीं लस घेऊन त्या आजारापासून सुरक्षित रहावे: डॉ. मोबीन खान
141.6k views | Washim, Washim | Sep 15, 2025 वाशीम (15 सप्टेंबर 2025): वाशीम शहरातील मदरसा दारूलउलूम सोफिनगर येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. काळे व साथरोग अधिकारी डॉ. मोबिन खान यांनी आज भेट देऊन विशेष MR लसीकरण मोहिमेची माहिती दिली. लसीचे महत्व स्पष्ट करून मुलांचे गैरसमज दूर करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य निरीक्षक नितीन व्यवहारे, मदरशाचे प्रमुख मौलाना अब्दुल जब्बार, नागरी आरोग्य केंद्राचे निरीक्षक अविनाश सोनाने व आरोग्य सेवक सय्यद उपस्थित होते.