जालना: दिव्यांगांच्या आंदोलनाला यश; महापालिका सभागृहात ५ टक्के निधी मंजूर
Jalna, Jalna | Apr 8, 2026 आज दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत दिव्यांगांच्या कल्याणासाठी ५ टक्के निधी मंजूर करण्यात आला. महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि आयुक्त अंजली शर्मा यांनी यासंदर्भात घोषणा केल्यानंतर सभागृहातील सर्व नगरसेवकांनी या निर्णयाला संमती दर्शविली. दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आंदोलने, मोर्चे, निवेदने आणि उपोषणे करण्यात येत होती. जिल्हाधिकारी कार