समुद्रपूर: मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजनेच्या ४० लाभार्थीना मंजुरीपत्राचे वितरण
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर कुणावार यांच्या मार्गदर्शनात मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मंजुरी प्रमाणपत्राच्या वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच विलास नवघरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य प्रणालीताई वांढरे, सुनिताई वाघाडे, राजु परचाके,तंटामुक्त समिचे अध्यक्ष अनिल धोटे,नोडल अधिकारी, मुख्याध्यापक रमेश वाघमारे,शिक्षक सुदाम थोरात आदी प्रामुख्याने उपस्थित होते.