तिरोडा: पूरग्रस्तांच्या आर्थिक मदतीकरिता माजी सैनिकांनतर्फे तिरोडा शहरात काढण्यात आली रॅली;गजानन मंदिर येथून झाली रॅलीला सुरुवात
Tirora, Gondia | Sep 14, 2025 पंजाब राज्यात महापुरामुळे झालेले नुकसान ग्रस्त नागरिकां करीता मदत म्हणून तिरोडा येथील मांजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे १४ सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता दरम्यान रॅली काढण्यात आली. रॅली ची सुरुवात गजानन मंदिर तिरोडा येथून झाली. त्यानंतर राणी अवंतीबाई चौक, जावेद ट्रेडर्स, तेल टंकी, प्रेम बंधन लॉन, कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रभागा नाका, युनियन बँक, पोलीस स्टेशन, काँग्रेस कार्यालय मागार्ने रॅलीचे भ्रमण करून माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे सभागृहात रॅलीचे समारोप करण्यात आले.