भद्रावती: बोलैरोची दोन दुचाकींना धडक,एकाचा मृत्यू तर पिच जखमी.
माजरी येथील घटना.
एम.एच.३१ एफसी ६६८७ या भरधाव बोलेरो गाडीने एम.एच.३४ एसी १४७४ व एम.एच.३४ बिइ ८५५३ या क्रमांकाच्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कोंडापरली राजमोगली व्यंकटचारी रा.माजरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर इतर पिच जण गंभीर जखमी झाले आहे. सदर घटना माजरी येथील नागमंदिर समोरील रस्त्यावर दिनांक २८ रोज रविवारला रात्रो ८ वाजताच्या सुमारास घडली. माजरी पोलीसांनी बोलेरो चालक अजीत पावडे याला याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.