गेवराई शहराजवळील बाह्यवळण रस्त्यावर (बायपास) उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मंगळवारी ट्रक आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली होती. आज मंगळवारी एक कंटेनर बीडकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होता, तर ट्रक विरुद्ध दिशेने म्हणजेच छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे येत होता. गेवराई शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या इसार पंपाजवळ घडली.