अक्कलकुवा: बांधकाम कामगार कार्यालयाच्या कारभाराविरोधात महिला आक्रमक; तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरात बांधकाम कामगार कार्यालयाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून आज चार ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास महिला आक्रमक होत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. दुपारी चारच्या सुमारास स लेखी आश्वासनानंतर आंदोलन माघारी घेण्यात आले.