अलिबाग: कोण कुणाच्या मागे आहे हे सर्वांना कळलं आहे
हाके यांना भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे प्रतिउत्तर
Alibag, Raigad | Sep 14, 2025 जरांगे यांच्या आंदोलनाला शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेची शिवसेना रसद पुरवत आहे असा आरोप हाके यांनी केला. त्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले मला वाटतं हा विषय आता संपलेला आहे. प्रत्येकाला राजकारण करायचं आहे. कुणाला समाजाच्या जीवावर राजकारण करायचं आहे. कुणाला राजकीय पोळी भाजायची आहे. जो विषय संपलेला आहे त्यावर बोलून कुणी सामाजिक मतभेद कसे उफाळून येतील असं काम कुणी करू नये. सर्व समाजाचे हक्क अबाधित ठेवून सरकार निर्णयघेत असतं. कोण कुणाच्या मागे आहे हे सर्वांना कळलं आहे.