30 जानेवारीला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे मानकापूर हद्दीतील झिंगाबाई टाकळी परिसरात तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव साहिल उर्फ नानू असे सांगण्यात आले आहे आरोपीकडून 350 रुपये किमतीची एक तलवार जप्त करण्यात आली आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.