नागपूर शहर: कफ सिरपमुळे वीस बालकांचा मृत्यू झाल्याची कबुली, रुग्णालयात जाऊन बालकांची मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे आतापर्यंत २० बालकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेंद्र शुक्ल यांनी दिली आहे. नागपूर येथे दाखल असलेल्या बालकांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी ते शासकीय रुग्णालयात आले होते.उपमुख्यमंत्री शुक्ल यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली आणि दाखल असलेल्या मुलांच्या प्रकृतीची माहिती घेतली.