वर्धा: खासदार अमर काळे यांच्या पाठपुराव्यामुळे आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावर तात्काळ पथदिवे सुरू
Wardha, Wardha | Nov 1, 2025 बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावर पथदिवे सुरू न झाल्याने पुलावर अंधाराचे साम्राज्य होते,या पार्श्वभूमीवर खासदार अमर काळे यांनी बांधकाम विभागाला पत्र देऊन लाईट तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले होते. “दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पथदिवे सुरू करण्यात आले आहे,यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे,याबाबत खासदार अमर काळे यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.