चंद्रपूर: निरज कॉलनी येथील परिसरात सौरभ होरे फाउंडेशनच्या वतीने वृक्ष दिंडी ; १०० वृक्षरोपण अभियान
सौरभ होरे फाउंडेशनच्या वतीने वृक्ष दिंडी व वृक्ष रोपण अभियान आज दि 19 ऑक्टोबर ला 10 वाजता निरज कॉलनी येथील परिसरात राबविण्यात आले. निरज कॉलनी येथील पटांगणावरून वृक्ष दिंडी निघून वक्रतुण्ड चौक ते कर्मयोगी गाडगे बाबा चौक ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक ते संत गजानन महाराज, स्वावलंबि नगर येथे पोहचली.