खांदा वसाहतीमधील प्रभाग क्रमांक १४ मध्ये महायुतीच्या उमेदवारांना मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर प्रभाग १४ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचे ठामपणे सांगितले. या परिसरात ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचा पाठिंबा महायुतीच्या उमेदवारांना मिळत आहे. ताफ्यामुळे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.