कारागृहात धर्मांतरण करण्यासाठी कैद्यावर दबाव आणला जातो, ॲडव्होकेट आघाव यांचा शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेतून आरोप
बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात असून, त्याकरिता त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप बंदिवान कैद्यांचे वकील ॲडव्होकेट राहुल आघाव यांनी केला आहे.या आरोपांमुळे बीडचे जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ॲडव्होकेट राहुल आघाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पक्षकार असलेले चार कैदी -तीन हिंदू आणि एक मुस्लिम यांनी लेखी तक्रार केली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेतून त्यांनी दिली.