18 जानेवारीला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंबे नगर येथून तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव प्रदीप शाहू असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून दुचाकी व विविध तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण एक लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी पारडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.