दिग्रस: शहरात २३ कोटी ८५ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन, मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मध्यरात्रीपर्यंत कार्यक्रम
दिग्रस शहराच्या विकासाला गती देण्यासाठी तब्बल २३ कोटी ८५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भव्य भूमिपूजन कार्यक्रम दिमाखात पार पडला. या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते दि. १८ ऑक्टोबर रोजी रात्री ११:३० वाजेपर्यंत करण्यात आले. मंत्री संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, नाली आणि मूलभूत सुविधांसाठी मोठा निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामांचे भूमिपूजन उदघाटन यावेळी करण्यात आले.