जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातून चोरीस गेलेल्या कार वाहनाबाबतचा गुन्हा एमआयडीसी पोलीसांनी मोठ्या शिताफीने उघडकीस आणला आहे. या कारवाईत चोरीला गेलेले सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे स्विफ्ट डिझायर कार वाहन हस्तगत करण्यात आले असून, एका संशयितालाही अटक करण्यात आली आहे. अशी माहिती बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे.