रत्नागिरी :7 एप्रिल 2025 रोजी..जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा परिषद रत्नागिरी येथे ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन
461 views | Ratnagiri, Maharashtra | Apr 7, 2025 जागतिक आरोग्य दिनाचे निमित्ताने जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.वैदेही रानडे (भा.प्र.से) यांचे सूचनेनुसार व मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांचे मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ,जिल्हा परिषद रत्नागिरी येथे ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.वैदेही रानडे (भा.प्र.से) यांचे अध्यक्षतेखाली व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र गावडे, डॉ. देविदास चरके यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे वक्ते प्रादेशिक मनोरूग्णालय रत्नागिरीचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ.संजयकुमार कलगुटगी यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.