काटोल: काटोलमधील सराईत जुगारी युनूस शेखवर एमपीडीए अंतर्गत कारवाई; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी
Katol, Nagpur | Jan 26, 2026 काटोल पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध जुगार अड्डे चालवणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर नागपूर ग्रामीण पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. युनूस शेख अयुब शेख असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून त्याला कारागृहात धाडण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी युनूस शेख हा काटोल शहर व परिसरात सातत्याने अवैध जुगार अड्डे चालवत होता. त्याच्यावर यापूर्वीच अवैध जुगाराचे ८ गुन्हे दाखल आहेत.