राजूरा: जिल्ह्यातील कामगारांसाठी तालुका स्तरावर भांडे वाटप केंद्र सुरू करा ;आ. देवराव भोंगळे यांची मागणी
राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांनी राज्याचे कामगारमंत्री ना. आकाशजी फुंडकर यांची विधानभवनातील दालनात भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी प्रत्येक तालुका स्तरावर भांडे वाटप केंद्र सुरू करण्याबाबत निवेदन दिले आणि तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आज दि.१० डिसेंम्बर ला १२ वाजता केली. सध्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून ज्या भांड्यांचे वाटप केले जाते, त्याचे केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली एमआयडीसी परिसरात फक्त एकाच ठिकाणी आहे.