पालघर: रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे नूर हॉल परिसरात मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
वसई विरार महानगरपालिका प्रभाग समिती अंतर्गत नूर हॉल परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण काम आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पाठपुराव्याने मंजूर करण्यात आले आहे. या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यामुळे वाहतुकीसाठी नागरिकांना सुसज्ज सुस्थितीतील रस्ता उपलब्ध होणार आहे. या भूमिपूजन प्रसंगी मान्यवर, परिसरातील नागरिक, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.