नागपूर ग्रामीण: ४ जुलैला नागपुरात शेतकरी सन्मान सोहळा; ४ प्रगतशील शेतकऱ्यांचा होणार गौरव
'हरित क्रांतीचे प्रणेते' वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ४ जुलै रोजी नागपुरातील वनामती सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वसंतराव नाईक फाऊंडेशन व कृषी विकास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शेतीतील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ४ प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.