उमरी तालुक्यातील कळगाव शेत शिवारात काल रात्री शेतकरी गंगाधर आनंदा यमलवाड यांच्या शेतातील वगाराची शिकार बिबट्याने केली असल्याची आजरोजी सकाळी उघडकीस आली होती, त्यानंतर आजरोजी सकाळीच्या सुमारास गणेश पुरभाजी यमलवाड ह्या शेतकऱ्याला बिबट्या दिसला त्यांनी आरडाओरड करत झाडावर जात आपले प्राण वाचवले होते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्याला भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होते आहे.