जालना: जालना-येलहंका दरम्यान विशेष रेल्वेगाडी; प्रवाशांना दिलासा; नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभागाची माहिती
Jalna, Jalna | Jun 24, 2026 प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने जालना-येलहंका-जालना दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 07601/07602 ही विशेष रेल्वे 28 जूनपासून 27 जुलै 2026 पर्यंत प्रत्येकी पाच फेर्या करणार असून यामुळे मराठवाडा आणि कर्नाटकदरम्यान प्रवास करणार्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अशी माहिती बुधवार दि. 24 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता नांदेडच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. गाडी क्रमांक 07601 जालना-येलहंका रेल्वे प्रत्येक रविवारी धावेल.