जिल्ह्यात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांना शासनाच्या जीआर (GR) नुसार कामे देण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही, जिल्ह्यातील शासकीय अधिकारी या संस्थांना कुठल्याही प्रकारचे काम देत नाहीत, असा गंभीर आरोप बेरोजगार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या संस्थांच्या न्याय हक्कासाठी आणि शासनाच्या योजनांमध्ये त्यांना प्राधान्य मिळावे या मागणीसाठी आज भंडारा येथून सुशिक्षित बेरोजगार सेवा संघाचा भव्य मोर्चा हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे.