कळंब: शेलगाव जहागिरी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस,गावकऱ्यांच्या घरात शिरले पाणी तर शेतीच मोठ नुकसान
कळंब तालुक्यातील येरमाळा महसूल मंडळातील शेलगाव जहागिरी गावात दि.14 सप्टेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे गावातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेले आहेत घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांच्या गहू-तांदूळ, घरगुती साहित्य यांचे मोठे नुकसान झाले आहे.तर शेतीच नुकसान झाल तसेच गावातील पुल देखील वाहून गेला आहे त्यामुळे शासनाने लक्ष देवुन नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी दि.14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता दिली आहे.