बुलढाणा: सैनिकी कल्याण विभागात लिपिक टंकलेखक पदांची भरती
सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) एकूण 72 पदांकरिता माजी सैनिक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक माजी सैनिक उमेदवारांनी दि. 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी 14 आक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता केले आहे.