पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रक्रियेत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणे, पत्रकार परिषद घेऊन जिल्हा अध्यक्षांविषयी आक्षेपार्ह विधाने करणे तसेच पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात भूमिका घेणे या गंभीर कारणांमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष तसेच पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी नियुक्त निरिक्षक व प्रभारी नरेंद्र गायकवाड यांनी नऊ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षांसाठी निलंबन केले आहे.