बार्शीटाकळी: वंचित बहुजन आघाडीची नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची घोषणा..
राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीनेही आपले उमेदवार घोषित केले असून नगराध्यक्ष पदासाठी चार ठिकाणांहून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. बार्शीटाकळी नगरपंचायत अख्तर खातून अलिमोद्दीन, मूर्तिजापूर नगरपरिषद शेख इम्रान शेख खलील, विद्या शामस्कर तेल्हारा, स्वाती चिखले, अकोट यांची नावे घोषित केली आहेत