रत्नागिरी : तालुकास्तरीय अॅनिमिया नियंत्रण प्रकल्पाचे उदघाटन
411 views | Ratnagiri, Maharashtra | Aug 23, 2025 रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांमध्ये आणि बालकांमध्ये वाढत्या रक्तक्षयाच्या समस्येवर मात करण्यासाठी तालुकास्तरीय “अॅनिमिया नियंत्रण प्रकल्पाचे उद्घाटन”उत्साहात पार पडले.या उपक्रमाचे आयोजन श्रीमद राजचंद्र हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर धरमपूर, जि. वलसाड (गुजरात) व स्वयंपूर्तता फाऊंडेशन, रत्नागिरी यांच्या वतीने, जिल्हा परिषद आरोग्य विभाग रत्नागिरी यांच्या सहकार्याने करण्यात आले.अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदेही रानडे होत्या.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये,अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र गावडे,डॉ.सातव,रामचंद्र हॉस्पिटलचे प्रोग्राम डायरेक्टर विरेन गांधी,स्वयंपूर्तता फाऊंडेशनच्या श्रीम रांबाडे ,युयुत्सु आर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.