आज दिनांक 15 डिसेंबर रोजी सातच्या दरम्यान पेनुर येथील नव्याने तयार केलेला डांबरी रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा ग्रामस्थानी उघड केला. रस्ता चक्क हाताने उखडत असल्याचा नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील पेनुर येथील हा प्रकार आहे. काही दिवसापूर्वी पेनुर या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले. पण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट होत आहे. पेनुर येथील गावकऱ्यांनी हा रस्ता चक्क हाताने उखडून दाखवला. हाताने डांबरी रस्ता उखडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.