जालना: श्रीराम फायनान्सकडून दादागिरीचा आरोप; मनसेचा आक्रमक इशारा
Jalna, Jalna | Jun 2, 2026 जालना शहरात श्रीराम फायनान्सकडून कर्जदार नागरिकांवर दादागिरी केली जात असून बळजबरीने वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव विलास तिकांडे यांनी केला आहे. या प्रकाराविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून संबंधित कंपनीने आपली कार्यपद्धती सुधारावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. विलास तिकांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांशी मानवी दृष्टिकोनातून वागण्याऐवजी