नागपूर ग्रामीण: नागपूर पोर्टस् हब आणि तीर्थक्षेत्र विकास कामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शनिवारी नागपूर पोर्टस् हब प्रकल्प आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला.विकासकामात कोणतीही त्रुटी राहू नये आणि कामाचा वेग वाढवावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात साकारत असलेल्या या प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांनी बारकाईने पाहणी केली. शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम जोत्यापर्यंत पूर्ण झाले असून इतर कामे प्रगतीपथावर आहेत.