डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी एक महिन्याचे विनामूल्य उद्योजकता विकास प्रशिक्षण ३० ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. किमान आठवी उत्तीर्ण आणि १८ ते ४५ वयोगटातील उमेदवारांना प्रवेश मिळणार असून निवड २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता मुलाखतीतून होईल. प्रशिक्षणात उद्योग उभारणी, वित्तीय व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग आणि शासकीय योजनांबाबत मार्गद