पलूस: अंकलखोप येथील एकास शेतातील मोटारीचा शॉक लागून गून ठार
Palus, Sangli | Aug 18, 2025 अंकलखोप येथील घनःश्याम बजरंग कुराडे (वय ४३) हा शेतातील मोटारीचा शॉक लागल्याने मयत झाला. याबाबतची वर्दी आष्टा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशिष काळे यांनी दिली. घनःश्याम कुराडे हे शनिवार, दि. १६ रोजी सायंकाळी सहा वाजता घरगुती वापराची मोटार चालू करण्यासाठी घरासमोरील विहीरीवर गेले होते. त्याच वेळी त्यांना मोटारीचा करंट लागून ते कोसळले. घरातील लोकांनी तातडीने उपचारासाठी आष्टा येथील ग्रामिण रुग्णालयात नेले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी ते मयत झाल्याचे सांगितले.