जालना: दुधना नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक; मौजपुरी पोलिसांची कारवाई, 5 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त
Jalna, Jalna | Apr 21, 2026 जालना तालुक्यातील घेटुळी शिवारातील दुधना नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरवर मौजपुरी पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एकूण 5 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगळवार दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणार्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सहायक पोलीस निरीक्षक यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मौजपुरी पोलिसांकडून माहिती संकलन सुरू असताना कारवाई केली.