नागपूर शहर: पत्नीने पतीच्या डोक्यावर फोडली दारूची बॉटल; पांढराबोडी येथील घटना
अंबाझरी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 29 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास पांढरा बोडी येथे नेहमीच्या त्रासाला कंटाळून एका पत्नीने दारुड्या पतीच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. व महिला घटनास्थळावरून फरार झाली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. याबद्दलचा अधिक तपास अंबाझरी पोलीस करीत आहे.