जालना: जालन्यात इंधन संकट गडद; तब्बल 59 पेट्रोल पंप बंद
Jalna, Jalna | May 23, 2026 जालन्यात इंधन टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून जिल्ह्यात तब्बल 59 पेट्रोल पंप बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. जालना तालुक्यात सर्वाधिक 24 पेट्रोल पंप बंद असल्यामुळे वाहनधारकांना इंधनासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे त्या पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करूनही इंधन मिळत नसल्याने