दिग्रस: शहरात पुरवठा विभागाची धडक कारवाई, दिग्रस शहरातील विविध हॉटेल्समधून १० घरगुती गॅस सिलेंडर जप्त
घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिक हेतूंसाठी वापरतांना आढळून आल्याने पुरवठा विभागाने १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता विविध हॉटेल्सवर अचानक धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत एकूण दहा घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून, जप्त केलेले सिलेंडर चिंतामणी गॅस एजन्सीच्या ताब्यात देण्यात आले आहेत. तहसीलदार राऊत यांच्याकडे प्राप्त तक्रारीवरून तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार पुरवठा विभागाचे पथक दिग्रस शहरातील जुना पोस्ट ऑफिस परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मानोरा चौक, शंकर टॉकीज परिसरात केली.