दिग्रस: ग्रामीण रुग्णालयात “सशक्त नारी, सशक्त परिवार” अभियानाचे मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन
दिग्रस ग्रामीण रुग्णालयात “सशक्त नारी, सशक्त परिवार” या विशेष आरोग्यवर्धक अभियानाचे उद्घाटन मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान करण्यात आले. या अभियानांतर्गत महिलांच्या सर्वांगीण आरोग्य सुरक्षेसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.