16 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे मानकापूर हद्दीतील न्यू गांधी ले आऊट येथे राहणारी राणी यदुवंशी हिचा पती आरोपी सुनील हा घरी कामावरून परत आला असता राणी ही फोनवर बोलताना दिसल्याने पती-पत्नीमध्ये वाद झाला. दरम्यान सुनीलने राणीला थापड मारली राणीने देखील सुनीलला थापड मारली याच रागातून सुनीलने तिचा गळा दाबून तिचा खून केला. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.