राजूरा: हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र मोहिमेचा,मराठवाडा मुक्ती दिन निमित्याने जि.प. मा.तथा उच्च मा.शाळा राजुरा येथे शुभारंभ
हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र मोहिमेचा,मराठवाडा मुक्ती दिन निमित्याने वन परिक्षेत्र कार्यालय राजुरा च्या सौजण्याने जिल्हा परिषद माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळा राजुरा येथे आज दि 17 सप्टेंबर ला 12 वाजता प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष स्थानी प्राचार्य किशोर उईके होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर,वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगडे ,क्षेत्र सहायक संजय गरमडे, प्रकाश मत्ते,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.