पिंप्राळा परिसरातील एका भागात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर विभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने सोमवारी १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी ४ पीडित महिलांची सुटका केली असून, संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पिंप्राळा आणि रामानंदनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.