पोलीस ठाणे जुनी कामठी नागपूर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक वाचनालय समोर राहणाऱ्या हिमांशू कडनाईके वय 24 वर्ष याने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीवरून कृतक हा जीएसटी ऑफिसमध्ये काम करीत होता व दारू पिण्याच्या सवयीचा होता तो नेहमी घरी दारू पिण्यासाठी पैसे मागत होता आणि भांडण देखील करीत होता घटनास्थळी काहीही संशयास्पद आढळले नाही याप्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील पोलीस करीत आहे.